वाकी- शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानाही प्लॅस्टिकचा सर्रासपणे व मोठ्याप्रमाणावर वापर करणाऱ्या महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील व्यापारी व दुकानदारांवर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाईचा बडगा उगारून केलेल्या कारवाईत एकूण 45 हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली.
प्लॅस्टिक बंदीवर कारवाई व्हावी, याकरिता संपूर्ण गावात जनजागृती करून या संदर्भात तातडीची ग्रामसभा घेण्यात आली. प्लॅस्टिक बंदी झाली पाहिजे, यावर सर्वानुमते ठराव मंजूर झाला असतानाही गावातील काही व्यापारी व दुकानदार सर्रासपणे शासनाचा आदेश झुगारून प्लॅस्टिक वापरत होते. यासाठी गावात प्लॅस्टिक विरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच विशाल भोसले, ग्रामपंचायतीच्या सदस्या ऍड. कृतिका वाळके, सुनील मिंडे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पारासुर, तंटामुक्‍तीचे अध्यक्ष प्रकाश महाळुंगकर आदींनी भाग घेतला होता. या कारवाईत एकूण 45 हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली. सरपंच कल्पना कांबळे यांनी यावेळी सांगितले की, प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदार अथवा व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने अखंडपणे कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. याची दक्षता संबंधित दुकानदारांनी घेण्याची गरज आहे. त्यानंतर होणाऱ्या दंडात्मक कारवाईला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)