पिंपरी – महापालिका ई-क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये प्लास्टिक मुक्‍त मोहीम अंतर्गत एकूण 2 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. यावेळी संबंधीत व्यावसायिकाला पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच, भोसरीतील राजमाता जिजाऊ उडडाणपुल परिसरात अनधिकृत जाहिरात करणारे स्टीकर काढून संबंधीत व्यावसायीकावर अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

च-होली फाटा जवळ पाण्याच्या साठयामध्ये डासाच्या आळया सापडल्याने बांधकाम व्यावसायिकावर चार हजाराचा दंड आकारला आहे. ही मोहीम क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगड व सहायक आरोग्याधिकारी पी.आर. तावरे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य निरीक्षक राजु साबळे, सुधिर वाघमारे, मलेरिया रोहन डामसे यांनी सदर कामकाज केले.

भोसरीपरिसरात क्षेत्रीय कार्यालयांतंर्गत स्वच्छता मोहीम, प्लास्टीकबंदी तसेच आरोग्य विषयक मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी जे कोणी दोषी अढळतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने नियमांनुसार दंडात्मक किंवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत आहे. यावेळी नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याची व पर्यावरणाची काळजी घेत महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिक व व्यावसायिकांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)