प्लॅस्टिक बॉटल्सची विल्हेवाटी लावण्यासाठी आणखी 11 प्रकल्प

‘सीएसआर’मधून उभारणार प्रकल्प


स्थायी समितीची मान्यता

पुणे- शहरात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल्सवर प्रक्रिया करण्यासाठी आणखी 11 ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. आर्टस्‌ अलाईव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून हे प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत या पूर्वी औंध आणि कोरेगाव पार्क परिसरात हे प्रकल्प सुरू आहेत. तर संपूर्ण शहरात 56 प्रकल्प उभारले जाणार असून हे सर्व सीएसआर मधूनच उभारले जाणार आहेत.

शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात सुमारे 130 ते 150 टन प्लास्टिकचा कचरा असून त्यात सुमारे 10 टन प्लास्टिकच्या बाटल्या आहेत. त्यावर प्रक्रीया करण्यासाठी महापालिकेने या पूर्वी शहरात दोन प्रकल्प उभारलेले आहेत. प्रत्येक प्रकल्पात सुमारे 10 हजार बॉटल्सवर प्रक्रिया केली जाते. मात्र, त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात बॉटल्सची संख्या वाढतच असल्याने महापालिकेने शहरात सुमारे 56 ठिकाणी हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत सुमारे 11 प्रकल्प उभारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यासाठी या संस्थेला जागा, वीज आणी पाणी जोड पुरविणार असून त्याबदल्यांत या संस्थेने प्लॅस्टिक बॉटल्सवर प्रक्रिया केली जाणार आहे.

 संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था
या संस्थेकडून शहरात बाटल्या संकलन करण्यासाठी स्वतंत्र्र व्यवस्था उभारली जाणार आहे. त्या अंतर्गत माय पिट बिन्स नावाच्या बॉटल संकलन करणाऱ्या बकेट विविध ठिकाणी, कॉम्प्लेक्‍स, सेंट्रल बिझनेस सेंटर, धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणे, मोठ्या शैक्षणिक संस्था, इव्हेंट होणारी स्थळे, प्रदर्शनाची केंद्रे यांची निवड केली आहे. या बिन्सला लागणारी प्रत्येकी अडीच ते तीन फूट जागा महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)