प्लॅस्टिक बंदी’ कारवाईत 20 हजारांचा दंड वसूल

पिंपरी – राज्यात प्लॅस्टीक बंदी असतानाही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी (दि. 4) संयुक्त कारवाई केली. अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, नेहरुनगर, देहू आळंदी रस्ता, चिखली व मोशी परिसरात सुमारे 70 व्यावसायिकांची तपासणी करत, त्यांच्याकडून सुमारे अठरा किलो प्लॅस्टिक जप्त करण्याबरोबरच वीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी ज्योती सुतार, सुषमा कुंभार, सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचन गौडार, अंकुश झिटे व राजेंद्र उजैनवाल यांच्या पथकाने मासुळकर कॉलनी येथून या कारवाईला सुरुवात केली. शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असून त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळावा. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन या पथकाने यावेळी केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)