“प्लॅस्टिक बंदी’ अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेतर्फे कार्यशाळा

पुणे, दि. 12 – “प्लॅस्टिक बंदी’ आदेशाची ग्रामीण भागात आजही अंमलबजावणी होत नाही. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि प्लॅस्टिक बंदीची का गरज आहे, याबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येत्या मंगळवारी (दि.19) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा कलामंच येथे ही कार्यशाळा होणार आहे, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागांचा विकास झपाट्याने वाढत आहे. आता विविध व्यवसाय शहरातून ग्रामीण भागात उभे राहत आहेत. त्यामुळे व्यापारी, दुकानदार यांच्याकडून प्लॅस्टिकचा सर्रासपणे वापर केला जात आहे. ग्रामीण भागात प्लॅस्टिक निर्मूलन करण्यासाठी स्थानिक प्रशासन व प्रदूषण विभागाने कार्यशील राहणे आवश्‍यक आहे. विशेषतः मोठ्या बाजार पेठेच्या गावामधून सर्रास प्लॅस्टिकचा वापर होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसाठी प्लॅस्टिक बंदीवरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)