प्लॅस्टिक बंदीसाठी आता नगरसेवकांना गळ!

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय : परराज्यांतून प्लॅस्टिकची आवक

कारवाईवेळी प्रशासनाला करावा लागतो अडचणींचा सामना

पुणे – राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई केली जात आहे. यादरम्यान अनेक ठिकाणांवरून प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही अजूनही शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने वार्ड स्तरावर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्याचे प्रयत्न राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“प्लॅस्टिक बंदीनंतर शहरातील अनेक दुकाने, कंपन्या यांच्यावर छापा टाकत मंडळाने मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक माल जप्त केला आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. यामध्ये विशेषत: परराज्यांतून येणाऱ्या प्लॅस्टिक मालाचे प्रमाण जास्त आहे,’ असे मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे.

“या प्लॅस्टिकबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने कारवाई केली जात आहे. मात्र, जिल्ह्याचा एकूण व्याप बघता, सध्या उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे ठरत नाहीत. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील नगरसेवकांना या कार्यात सहभागी करून घेत, वार्डस्तरावर प्लॅस्टिकबंदीची कारवाई राबविण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा करून कायद्यात बदल करण्याच प्रस्ताव आम्ही सादर केला असून, लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्लॅस्टिकविरोधी कारवाईसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर ही कारवाई करण्यापूर्वीच त्याची “टीप’ संबंधित व्यावसायिकांना देऊन त्यांना सावध केले जाते. यामुळे कारवाईत अनेक अडथळे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)