प्लॅस्टिक बंदीवरून भाजपा आमदाराचा सरकारला घरचा ‘आहेर’

मुंबई: प्लॅस्टिक बंदी वरून फडणवीस सरकारला विरोधक घेरत असतानाच भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी राज्यसरकारला घरचा ‘आहेर’ दिला आहे. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा अतिशय घाईत व कोणत्याही नियोजनाशिवाय घेण्यात आला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. प्लॅस्टिक बंदी डिसेम्बर २०१९ पर्यंत पुढे ढकलण्यात यावी व या काळात राज्यसरकारने प्लॅस्टिकला पर्यायी व्यवस्था उभा करावी असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिला आहे.

राज्यभरामध्ये २३ जून पासून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून यावरून समाजामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुरोहित यांनी प्लॅस्टिक बंदी संर्भात मुखमंत्र्यांची देखील भेट घेतली असून, त्यांनी बंदीमुळे छोट्या व्यापाऱ्यांना आलेल्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)