प्लॅस्टिक बंदीमुळे बसस्थानकाचे रुप पालटले

संकलित होणारा कचऱ्यात 75 टक्के घट : बंदीला प्रवाशांचे समर्थन
नगर – गेल्या कित्येक वर्षांपासून प्लॅस्टिक कचऱ्यामुळे बसस्थानकात मोठी समस्या वाढली होती. स्वच्छता करुनही संकलित होणाऱ्या कचऱ्यामध्ये घट होत नव्हती. परंतु, शासनाने घेतलेला प्लॅस्टिक बंदीचा सकारात्क परिणाम पुढे आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संकलित होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यात 75 टक्के घट झाली असून, या बंदीला प्रवासी नागरिकांचेही जोरदार समर्थन आहे.
नागरिकांतून गेल्या तीन दिवसांपासून बंदीबाबत एकच चर्चा झडत होती. त्यातून अनेक तर्क वितर्क लढविले जात होते. परंतु, शासनाने घेतलेल्या या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे बसस्थानक परिसरात सकारात्मक परिणाम पुढे आला आहे. माळीवाडा बसस्थानकात कायमच प्लॅस्टिक ढीग असायचा. परंतु, प्लॅस्टिक बंदीमुळे बसस्थानकाचे रुप पालटले असून, बसस्थानक प्लॅस्टिक कचऱ्यापासून मुक्‍त होताना दिसत आहे. राज्य परिवहन महामंडळाने माळीवाडा बसस्थानकाचे स्वच्छता करण्याचे काम ब्रिक्‍स कंपनीला दिले आहे. या कंपनीचे काम सफाई कामगार सकाळ-संध्याकाळ करीत असतात. परंतु, शहरातील मध्यवर्ती असणारे माळीवाडा बसस्थानकात कायमच प्रवशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठी असल्याने कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर होत होते. मात्र, प्लॅस्टिक बंदी झाल्यापासून सकारात्मक परिणाम पुढे आला आहे. आज बसस्थानकाचा पूर्ण परिसर स्वच्छ झाला आहे. प्लॅस्टिक कचऱ्यातही 75 टक्के घट आली असून, प्रवाशांनीही या बंदीचे समर्थन केले आहे.

प्लॅस्टिक मुळेच अनेक शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
-विठ्ठल गायके
प्रवासी, ता. नेवासा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॅस्टिक बंदी ही झालीच पाहिजे. लोकांनीही पर्यावरणाचा धोका ओळखून प्लॅस्टिक बंदीचे समर्थन केले पाहिजे. प्लॅस्टिक ऐवजी लोकांनी कापडी अथवा कागदी पिशव्याचा वापर करावा.
चंद्रकांत गायके
प्रवासी, ता. नेवासा

प्लॅस्टिक बंदीमुळे बसस्थानक परिसरातील प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. या बंदीमुळे पर्यावरणाचीही हानी टळणार आहे. प्लॅस्टिक बंदीची कडक अंमलबजावणी राहिल्यास बसस्थानक अधिकाधिक स्वच्छ होईल आणि प्रवाशांचे आरोग्यही सुदृढ राहील.
-शिवाजी कांबळे
माळीवाडा बसस्थानकप्रमुख

प्लॅस्टिक बंदीमुळे बसस्थानकातील कचरा गायब
प्लॅस्टिक बंदीमुळे कचऱ्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. एसटी स्टॅण्ड बाहेरील ठेवलेले डसबीन हे सफाई करताना रोज दोन ते तीन वेळा प्लस्टिक कचऱ्याने भरत असत तर आज एकही डसबीन दिवसाअखेर भरत नाही. त्यामुळे स्टॅण्डही स्वच्छ झाले असून, सर्व ठिकाणी स्वच्छता राहत आहे. बसस्थानकातील कचरा गायब झाला असून, 75 टक्के फरक पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)