प्लॅस्टिक बंदीमुळे पेपर रद्दी खातेय भाव!

पिंपरी – शहरात जागोजागी हातगाड्या, किराणा दुकान, फुलांची दुकाने, छोटी हॉटेल्स या सर्व ठिकाणी प्लॅस्टिकसाठीचा पर्याय म्हणून पेपर रद्दीचा वापर होत आहे. मागणीत वाढ झाल्याने पेपर रद्दीची शहरात टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी किलोमागे सहा ते आठ रुपयांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

शहरातील हातगाडीवर चालणारे व्यवसाय, तसेच छोटी हॉटेल्य या ठिकाणी पार्सलसाठी पेपर रद्दीचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी 8 ते 9 रूपये किलोने रद्दी मिळायची आता ती किरकोळ घेतली तर 12 रूपये किलोने मिळत आहे. तसेच ठोक घेतली तर 16 ते 18 रूपये किलोने घेतली जात आहे, असे हॉटेल व्यावसायिक प्राण शेख यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लॅस्टिक बंदीमुळे फुल विक्रेत्यांना अडचणीना तोंड द्यायला लागत आहेत. फुल नाजूक असल्यामुळे त्यांना प्लॅस्टिकमध्ये ठेवायला सोपे जात होते. परंतु, प्लॅस्टिक बंद झाल्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. त्याला पर्याय म्हणून रद्दीचा वापर सध्या व्यापारी वर्ग करत आहेत. त्यामुळे गुच्छ बनवणे व्यापाऱ्यांनी बंद केले आहे. रद्दीचा पर्याय किरकोळ ग्राहकांसाठी ठीक आहे. एखाद्या वेळेस पाच किलोची फुलांसाठी मागणी झाली किंवा मोठ्या हारांची मागणी झाली. त्यावेळी ते द्यायला पंचाईत येत असल्याचे फुल विक्रेते सोमनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने याला चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ही त्यांनी केली.

सध्या कापडी पिशवीची देखील चलती बाजारात दिसून येत आहे. प्लॅस्टिक बंदीला तो पर्याय चांगला आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर करता येत नाही. प्लॅस्टिक तडकाफडकी बंदी केली आणि त्याला योग्य पर्याय ही दिला नाही. त्यामुळे नागरिक आणि व्यवसायिकांना मनःस्ताप सहन कराव लागत आहे. आधी प्लॅस्टिकशिवाय जसे व्यवहार चालू होते. तसेच आताही चालू होतील. बाजारातील चित्र आता बदलले असून नागरिक घरूनच पिशव्या घेऊन यायला लागले आहेत. तसेच हद्दपार झालेली वर्तमानपत्राच्या रद्दीला आता मोठी मागणी होत आहे. त्यामुळे रद्दीला “अच्छे दिन’ आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शहरातील रद्दीच्या दुकानावरील भाव काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त आढळून आले. तर काही जणांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. वर्तमानपत्राच्या रद्दीची खरेदी 9 रूपये किलो आहे. त्याची ठोकपणे विक्री 12 रूपये किलोने होत आहे. तर किरकोळ विक्री 16 रूपये किलो असल्याची माहिती विक्रेते भाऊसाहेब शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे खरेदीची किंमत जरी वाढली नसली. तरी किरकोळ वर्तमानपत्राच्या खरेदीची चलती असल्याचे चित्र बाजारात दिसून आले. त्याचबरोबर विक्रीच्या भावात देखील शहरात फरक दिसून येत आहे. तरी येत्या काही दिवसात रद्दीचे भाव वाढण्याची शक्‍यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)