प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड

30000 रुपये वसूल:वीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त

सातारा- प्रतिनिधी सातारा शहरातील दुकांनाची तपासणी मोहीम महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशीक कार्यालय व सातारा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा व्यवसायीक दुकानदारांवर 30 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

-Ads-

वीस किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. यामध्ये राजेंद्र वाघमारे शिवराज ट्रेडर्स , अनिल बाळु शेळके बालाजी नमकीन, संतोष मोहिते, मोहिते किराणा स्टोअर्स,दिनेश कोठारी गुरूनाथ कृपा, प्रशांत पाटकर शिरीष स्टोअर्स भवानी पेठ, इम्रान मोमीन सदाशिव पेठ, या सहा जणांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकुण तीस हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्लॅस्टिक मुक्ती आणी थर्माकोल मुक्त महाराष्ट्र अभियानाला नागरिकांच्यामधून सकारात्मक प्रतिसाद दिसतोय मात्र व्यवसायीक याकडे अद्याप दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करत असल्याची माहिती उपप्रादेशीक प्रदुषण महामंडळ कार्यालयाचे प्रमुख बाबासाहेब कुकडे यांनी यांनी दिली. प्रतिबंधीत वस्तु साठविल्यास किंवा आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई होणारच असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.

प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशीक कार्यालय व जिल्ह्यतील विविध नगरपरिषदांच्या माध्यमातुन या कारवाया अश्‍याच सुरू राहणार आहे. आज जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक बंदी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच व्यावसायीकांनी सहकार्य करणे आवश्‍यक आहे. प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यामध्ये विशेषत: पहिल्यांदा कारवाई साठी पाचहजार रूपये, दुसर्यांदा दहा हजार तर तिसर्यांदा पंचवीस हजार रूपये दंडांची तर तीन महिने कारावासाची शिक्षा आहे. या बाबत जिल्ह्यामध्ये एक व दोन वेळा कारवाई झालेल्यांची संख्या आहे. मात्र अद्याप तिनदा कारवाई झाली नसल्याचे कुकडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)