प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक पथकाची कारवाई

रांजणगाव गणपती- प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक पथकाने कारवाई करुन रांजणगाव येथून 50 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. पुणे येथील प्लॅस्टिक प्रतिबंधक विभागाचे क्षेत्र अधिकारी राजेंद्र जाधव, रेखा चोगरे आणि ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. रांजणगाव येथील 20 ते 25 दुकानांची अचानक तपासणी केली असता त्यात 12 जण दोषी आढळले. याबाबत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 50 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. भविष्यकाळात ही अशा स्वरुपाच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे राजेंद्र जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)