प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई

पहिल्याच दिवशी पाच हजार रूपयांचा दंड वसूल

पिंपरी (प्रतिनिधी)- राज्यात प्लॅस्टिक वापरावर घातलेल्या बंदीनंतरही वापरात असलेल्या व्यवसायिकांवर महापालिका प्रशासनाने आता कारवाई सुरु केली आहे. जनजागृतीनंतरही वापर करणाऱ्या निगडीतील गोकुळ स्वीट मार्टकडून पहिल्याच दिवशी (दि.17) पाच हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अन्य व्यावसायिकांनीदेखील प्लॅस्टिक वापराची धास्ती घेतली आहे.

राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक वापरावर बंदी गातली आहे. त्यानंतर नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी महापालिकेतर्फे प्लॅस्टीक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापरबंदी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘फ’ क्षेत्रिय कार्यालया मार्फत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या निगडीतील गोकूळ स्वीट मार्ट यांच्याकडून चार किलो बॅग जप्त करण्यात आल्या असून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

काही दिवसांपुर्वी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या एका वाईन शॉपवर दंडात्मक कारवाई केली होती. व्यावसायिक, दुकानदार, व नागरिकांनी प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर करु नये याकरिता प्रशासनाच्या वतीने प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठेवावी व्यावसायिकांकडे, टपरीधारक, पथारीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांकंडे कॅरी बॅगचा आग्रह करु नये. कापडी पिशवीचाच वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरी बॅगेचा वापर
राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी असली, तरीदेखील जनजागृती व सक्षम पर्याय उपलब्ध न होऊ शकल्याने आजही बाजारात प्लॅस्टिक कॅरी बॅगेचा वापर होत आहे. गिऱ्हाकांना कॅरी बॅग नाकारणारे व्यावसायिक गिऱ्हाईकांची अडचण लक्षात घेऊन, प्लॅस्टिकची कॅरीबॅग उपलब्ध करुन देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)