प्लॅस्टिक पिशव्या द्या, रोपटे घ्या

वाकड – प्लॅस्टिक पिशव्या द्या आणि रोपटे घ्या या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून तब्बल 650 किला प्लॅस्टिक यावेळी जमा झाले. हा उपक्रम, आंघोळीची गोळी संस्था आणि शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतामणी गणेश मंदिर वाल्हेकरवाडी या ठिकाणी राबविण्यात आला.

या दोन्ही सामाजिक संस्थांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्या जमा केल्या. प्रत्येक नागिरकास रोपटे देऊन झाडे जगविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समितीच्या सभापती शर्मिला बाबर ब प्रभाग समितीच्या अध्यक्षा करुणा शेखर चिंचवडे, स्थायी समिती सदस्य नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे नगरसेवक शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे शेखर बबनराव चिंचवडे, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, संदीप शिवले, माउली जगताप, सचिन काळभोर, प्रदीप पटेल, शंकर पाटील त्याचबरोबर रोटरी क्‍लबचे सदस्य सुनील कवडे, वसंत ढवळे, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचे कमलाकर गोसावी, तानाजी गाडे, पिंकी अडागळे , वैशाली कदम, त्याचबरोबर अंघोळीची गोळीचे माधव पाटील, सदस्य निखिल अग्निहोत्री, किशोरी अग्निहोत्री, अन्वर मुलाणी, प्राजक्ता रुद्रवार, उल्हास टकले, राहुल धनवे, चंद्रशेखर जोशी कै.तुकाराम तनपुरे फाउंडेशनचे अशोक तनपुरे, अनिल पालकर प्रकाश मिर्झापुरे, संदीप रांगोळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)