प्लॅस्टिक पिशवी बंदीच्या कारवाईला राज्य शासनाने स्थगिती द्यावी

व्यापा-यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ः अनेक संघटनांचा सहभाग
नगर – प्लॅस्टिक बंदी करतांना शासनाने कोणताच सक्षम पर्याय उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ व्यापा-यांवर आली आहे. शासनाने सक्षम पर्याय द्यावा. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेताना शासनाने कागदी बॅगाचा पर्याय ठेवला आहे. परंतु एवढया मोठ्या प्रमाणात कागद उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार असुन त्याचा पर्यावरणालाच फटका बसेल. राज्यातील प्लॅस्टिक रिसायकलींग उद्योगाला आधीच नोटा बंदीमुळे मोठा फटका बसला असुन त्यातुन सावरत असतांनाच शासनाने या उद्योगावर बंदी आणुन दुसरा घाव घातला आहे. प्लॅस्टिक बंदीचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला असल्याने प्लॅस्टिक बंदी हा पर्यायच होऊ शकत नाही, अशी ठाम भुमिका अहमदनगर प्लॅस्टिक उद्योग असोसिएशनने मांडली आहे.
प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करुन द्यावा. 50 मायक्रॉन पेक्षा अधिक जाडीच्या बॅगा चालू ठेवाव्यात. व्यापा-यांवरील दंडात्मक कारवाई शिथील करावी या मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा व्यापारी असोसिएशन, अहमदनगर शहर खाद्य पदार्थ व्यवसायिक संघटना, गंज बाजार – मोची गल्ली, रिटेल व्यापारी असोसिएशन, च्या वतीने गुरुवारी सकाळी 11 वा. भिंगारवाला चौक येथुन व्यापा-यांनी संघटित होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला सदर मोर्चा मधील मागणीचे निवेदन आर.डी.सी. पाटील यांना देण्यात आले.
या मोर्चात कापड, भांडे, खाद्य पदार्थ विक्रेते तसेच सर्वच स्थरावरील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गांधी, भाजपा युवा मोर्चा व्यापारी आघाडीचे प्रमुख अविनाश साखला, ईश्‍वर बोरा, पियुश लुंकड, नितीन जोशी, तुलसीबाई पालीवाल, जयेश चंदे, रमेश लुंकड, राहुल धोकरिया, जितेंद्र गुगळे, निलेश गुगळे, मिठाई असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन खंडेलवाल, सचिन जग्गड, विजय चोपडा, मयुर जामगावकर, दिनेश गोयल, ओमप्रकाश बायड, विकी नारंग, संतोष ठाकुर, अशिष पटेल, पंकज पंड्या यांच्यासह आदी व्यापारी उपस्थित होते.
जो पर्यंत सरकारकडुन स्पष्ट माहिती येत नाही. तो पर्यंत आपण संबंधीत अधिकाऱ्यांना कारवाई शिथील करण्यास सांगावी व दंड न करता सर्वांना कायद्याची माहिती देऊन जागृती करण्यास सांगावी. आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबध्द आहोत व त्याच्या रक्षणाची जबाबदारीही घेण्यास तयार आहोत.खाद्य पदार्थ व्यवसायिक संघटना, गंजबाजार – मोचीगल्ली रिटेल व्यापारी असोसिएशन या संघटनांनीही निवेदने दिली आहेत तरी या सर्व गंभीर बाबीचा राज्य शासनाने दखल घेऊन निवारण केले नाही, तर पुढील काही दिवसांत आम्ही सर्व व्यापारी मोठे आंदोलन उभारु असा इशारा या मोर्चाप्रसंगी भाजपा युवा मोर्चा व्यापारी आघाडी प्रमुख अविनाश साखला यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)