प्लॅस्टिक, थर्माकोल बंदी फूल शेतकऱ्यांसाठी ठरली वरदान

संग्रहित फोटो

बेल्हे – सध्या झेंडूच्या फुलांना मागणी वाढल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, राज्यात सुरू झालेल्या प्लास्टिक बंदीमुळे प्लॅस्टिक फुलांचे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. यापूर्वी शहरांमध्ये कुठल्याही कार्यक्रमाला खऱ्या फुलांऐवजी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. काही वेळा खऱ्या फुलांना मागणी असली तरी योग्य बाजारभाव मिळत नव्हता, याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. सध्या राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने झेंडूच्या फुलांबरोबर इतर फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि त्यास चांगला बाजारभाही मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने प्लॅस्टिकच्या फुलांना बंदी घातल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे तालुक्‍यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. आठच दिवसांपूर्वी या तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी झेंडूला बाजारभाव मिळत नसल्याने तोडणी बंद केली होती, तर काही शेतकऱ्यांनी झेंडू तोडून फेकून दिला होता. मात्र प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने, खऱ्या फुलांना मागणी वाढली असून आता चांगला बाजारभाव देखील मिळू लागला आहे. यापुढे विवीध कार्यक्रमांच्या ठिकाणी डेकोरेशनसाठी थर्माकोल, प्लॅस्टिकच्या फुलांना बंदी असल्याने झेंडूबरोबर इतरही फुलांना चांगला बाजारभाव मिळणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)