प्लॅस्टिक कॅरीबॅगला कापडी पिशव्यांचा पर्याय

रामदास कदम : प्लॅस्टिक व थर्माकोलबंदीची अधिसूचना लागू
मुंबई – प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून महिला बचत गटांनी कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू केली आहे. त्यांना पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. महिला बचतगटांच्या या कापडी पिशव्या लवकरच बाजारात येतील. कापडी पिशवीनिर्मितीच्या नाविन्यपूर्ण योजनांसाठी पालकमंत्र्यांनी देखील काही निधी बचत गटांना द्यावा, असे रामदास कदम म्हणाले.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक आणि थर्माकोल बंदीची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. या प्लॅस्टिकबंदीच्या नियमाचे जो कोणी उल्लंघन करेल त्याला 5 ते 25 हजार रूपयांपर्यंतचा दंड, तसेच तीन महिने कारावास अशी शिक्षा होणार आहे, अशी माहीती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलबंदीची घोषणा करण्यात आली होती. याबाबतची अधिसूचना राज्यात लागू झाली आहे. राज्यात रोज 1800 टन इतक्‍या मोठया प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा निर्माण होतो. याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. श्वसनाचे विकार, कॅन्सरसारखे असाध्य रोगही होत आहेत. लग्न तसेच कार्यक्रमात सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलवर बंदी असून छोट्या पिण्याच्या बाटल्यांवर पूर्ण बंदी आहे.

मोठ्या बाटल्यांवर बंदीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे प्लॅस्टिक तसेच थर्माकोलचा मोठा साठा आहे अशा उद्योगांना स्टॉक संपविण्यासाठी मुदत देण्यात येईल. या उद्योगांत काम करणाऱ्या हजारो कामगारांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचेही रामदास कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)