प्लॅस्टिक कारवाईत 11 हजार दंड वसूल

कोथरुड- कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात करण्यात आलेल्या प्लॅस्टिक कारवाईत 30 किलो प्लॅस्टिक व्यावसायिकांकडून जप्त करुन 11 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण 24 व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक अविनाश तेलकर, गणेश खिरीड, आरोग्य निरीक्षक भारती कोठाले, नरसिंह पटेल, शिवाजी गायकवाड, नवनाथ मोकाशी, वैभव घटकांबळे, सतीश बनसोड, गणेश साठे, संतोष ताटकर यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)