प्लॅस्टिक, ई-कचरा संकलन मोहीम

पुणे : दिवाळीनिमित्त घरोघरी सफाईचे काम मोठ्या प्रमाणात होत असते. यानिमित्ताने नको असलेल्या वस्तू, प्लॅस्टिक आणि ई-कचरा मोठ्या प्रमाणात बाजूला काढला जातो. मात्र, त्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया आणि पूर्णम इकोव्हीजन या संस्थांतर्फे संयुक्तपणे प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली.

संस्थांतर्फे सिंहगड रस्ता, वारजे आणि कर्वेनगर भागांमध्ये राबविलेल्या मोहिमेंतर्गत 20 संकलन केंद्रांची स्थापना केली होती. सर्व संकलन केंद्रांवर एकूण 2.4 टन ई-कचरा आणि 800 किलो प्लॅस्टिक संकलित केले. संकलित करण्यात आलेला हा कचरा शास्त्रीय पद्धतीने हाताळला जातो. तसेच पर्यवरणाला कोणताही त्रास न देता या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे पूर्णम इकोव्हीजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश मणेरीकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)