प्लॅस्टिकवर बंदीने सामान्यांची हेळसांड

ढोरजळगाव – शासनाने प्लॅस्टिकवर बंदी घातल्याने सर्व सामान्य तसेच व्यावसायिकांची मोठी हेळसांड होत आहे. नुकतीच प्लॅस्टिकवर शासनाने बंदी घातल्याने पिशव्या देणे व्यवसायिकांनी बंद केल. एखाद्या व्यवसायिक पिशवी देतांनी आढळला तर त्याला पाच हजार रुपये दंड ठोटावला जात आहे. आज विचार केला तर कुठेही गेले तरी काहीही वस्तू घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकांच्या जवळ पिशवी असेल असे नाही. किराणा दुकानदारापासुन तर कृषिसेवा केन्द्र आदी ठिकाणी प्लास्टिक पिशवीची मागणी केली जाते होती.

सध्या बाजारपेठेत प्लॅस्टिक पिशवीवर शासनाने घातलेल्या बंदीमुळे सर्वानांच मोठ्या आडचणीचा सामना करावा लागत आहे. प्लॅस्टिकला बंदी घालताना व्यवसायिका कापडी किंवा कागदी पिशवी घाऊक बाजारपेठत आणली असती तर सर्व सामन्याची हेळसांड थांबली असती . असे व्यवसायिकांमधुन बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)