प्लॅस्टिकबंदी योग्यच; अडचणींचा मात्र डोंगर

नियमांचे पालन सुरू 


कागदी, कापडी पिशव्यांचा पर्याय न परवडणारा


किरकोळ विक्रेते, मॉल्स आकारात आहेत अतिरिक्‍त पैसे

पुणे- प्लॅस्टिकबंदी निर्णयाचे व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडून पालन सुरू झाले आहे. मात्र, पर्याय म्हणून असणाऱ्या कागदी आणि कापडी पिशव्या काही अंशी अव्यवहार्य ठरत आहेत. तर, जड वस्तू आणि द्रव पदार्थ विक्रेत्यांची यामुळे चांगलीच अडचण होत आहे.

पूर्वी विक्रेते, मॉल्स, दुकानदार यांच्याकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होता. मात्र, बंदीनंतर कारवाईच्या भीतीपोटी छोटे- मोठे विक्रेते, मॉल्स, रिटेल्स विक्रेते अशा सर्वच ठिकाणी आता कापडी, कागदी पिशवीचा वापर होत आहे. काही मॉल्समध्ये कापडी पिशवीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.
प्लॅस्टिकबंदी आदेशानंतर व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये अजूनही काही अंशी संभ्रम आहे. वजनाने हलक्‍या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर भाजीपाला, फळ विक्रेते करत होते. पण, गेल्या चार-पाच दिवसांपासून मंडई, लष्कर भाग, आणि पेठांमध्ये भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी “कॅरिबॅग’ हद्दपार केल्या आहेत. प्लॅस्टिकऐवजी आता कगदी पिशव्यांचा वापर ते करत आहेत.

पार्सल देण्यासाठी पूर्वी प्लॅस्टिक पिशवी वापरत होतो. मात्र, आता बंदीपासून कागदी पिशवी वापरत आहे. यामध्ये ग्राहकांना चटणी, सांबार असे पातळ पदार्थ देण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे डबा आणण्याबाबत आम्ही ग्राहकांना सांगत आहोत.
– दावनगिरी डोसा विक्री केंद्र


बंदीपूर्वी भाजी देण्यासाठी ग्राहकांना प्लॅस्टिक पिशवी देत होतो. परंतु, आता ग्राहकांनी आणलेल्या कापडी पिशवीतून भाजी देत आहोत. कागदी पिशवीत कांदे, बटाटे अशा वजनदार फळभाज्यांचे वजन पेलू शकत नाही. त्यामुळे कागदी पिशवीचा वापर न करता ग्राहकांच्या पिशवीतच भाजी देणे सोयीचे ठरत आहे.
-शंकर शिंदे, भाजीपाला विक्रेते.


डीमार्टसारख्या ठिकाणी पूर्वी खरेदी केल्यानंतर प्लॅस्टिक पिशवीसाठी 3 ते 5 रुपये द्यावे लागत होते. मात्र, आता कापडी पिशवीसाठी 16 ते 17 रुपये द्यावे लागत आहेत.
– सिद्धार्थ वाघमारे, ग्राहक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)