प्लॅस्टिकबंदीसाठी पर्यावरण मंत्री रस्त्यावर

सिध्दिविनायक मंदिर परिसरातील दुकानदारांवर कारवाई
मुंबई – प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी पर्यावरण मंत्र्यांनी चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. मुंबईत प्लॅस्टिक बंदी अधिक कठोर करण्यासाठी खुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम आज रस्त्यावर उतरले. प्रभादेवी येथील सिध्दिविनायक मंदिराच्या परिसरातील दुकानदारांवर धाड घालत कदम यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

पर्यावरण मंत्री रामदास कदम सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिर परिसरात काही भाविकांच्या हातामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले दिसली. याबाबत त्यांनी भाविकांना विचारले असता मंदिर परिसरातील दुकानातून या पिशव्या दिल्याचे त्यांनी सांगितले. या दुकानांची तपासणी केली असता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्लॅस्टिकचा साठा आढळला. या प्रकारानंतर पर्यावरण मंत्र्यांनी कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून दुकानदारांवर कारवाई करुन दंड आकारण्याचे आदेश दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुजरात दमणचा साठा

सिध्दिविनायक मंदिर परिसरातील कारवाईनंतर इतर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेशही रामदास कदम यांनी दिले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मालाड, चिंच बंदर, मस्जिद बंदर या ठिकाणी प्लॅस्टिकच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो किलो प्लॅस्टिकचा माल जप्त केला.

भरारी पथकाने अजंठा ट्रान्सपोर्ट, मालाड, पूर्व या गोदामांवर कारवाई करुन बंदी असलेला 1 हजार 359 किलो प्लॅस्टिक जप्त करून पाच हजार रुपयांचा दंड आकारला. याशिवाय चिंच बंदर, मशिद बंदर आदी भागातील गोदामांवर धाडी घालून प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आला. हा माल गुजरात दमणमधून आणला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)