प्लॅस्टिकबंदीला 2019 पर्यंत स्थगिती द्या!

भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

मुंबई – प्लॅस्टिकबंदीला आमचा विरोध नाही. पण बंदी लागू करण्याआधी प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करून देणे आवश्‍यक होते. तसेच त्याचे रिसायकलिंग करण्यासाठी पालिकेने व्यवस्था करायला हवी होती. मात्र, याबाबत पालिका किंवा सरकारकडून कोणतीच व्यवस्था न केल्याने व्यापारी व जनतेमध्ये संभ्रम आहे. ही व्यवस्था होईपर्यंत प्लॅस्टिकबंदीला 2019 अखेरपर्यंत स्थगिती द्यावी. तसेच दंडाची रक्कम 100 ते 500 रूपयांपर्यंत ठेवावी, अशी मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज पुरोहित यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. प्लॅस्टिकबंदीला आमचा विरोध नाही. पण ती करण्याआधी प्लॉस्टिकला पर्याय देखील देणे आवश्‍यक आहे. सरकारने पर्यायी व्यवस्था शोधून काढण्याकरिता सरकार, पर्यावरण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी अशांचा समावेश असणारी समिती स्थापन करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्लॅस्टिकबंदीमुळे छोटे व्यावसायिक,सवर्सामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या दंडात्मक कारवाईमुळे सर्वसामान्य नागरीक व व्यापारी भयभीत झाले आहेत. बंदी लादण्यापूर्वी व्यापाऱ्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता.

महापालिका जनतेला कोणत्याही नागरी सुविधा योग्यपणे देत नाही त्याच पालिकेचे अधिकारी हा दंड घेत आहेत. ही अन्यायकारक वसुली तातडीने थांबविण्याची गरज असल्याचे राज पुरोहित म्हणाले.

प्लॅस्टिकचे रिसायकलिंग जरी योग्यरितीने झाले तर ही समस्या सुटेल. यातून पैसा देखील मिळतो. लंडनमध्ये स्थानिक भारतीयांनी स्वामीनारायण मंदिर बांधले आहे. तेथील जनतेने आठ वर्षे त्यांनी वापरलेल्या शीतपेये आदीच्या प्लास्टिक बाटल्या विकून निधी उभा केला. या निधीतूनच हे भव्य मंदिर उभारण्यात आले. आपल्याकडेही या माध्यमातून निधी उभारता येउ शकेल. महापालिकेने प्रत्येक वॉर्डात प्लॅस्टिक जमा करणारी यंत्रणा उभारावी. हे जमा केलेले प्लॅस्टिक रिसायकल करावे असेही राज पुरोहित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)