प्लॅस्टिकच्या चिनी फुलांच्या विक्रीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मनसेचे एल्गार

पुणे – सध्या सर्वत्र चिनी प्लॅस्टिकची फुले डेकोरेशनसाठी वापरली जातात. दिवेसनदिवस त्याची विक्री वाढत चालली आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक फुलाचा विक्रीवर होत आहे. फुलांची विक्री कमी होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी होणारी प्लॅस्टिक फुलांची
विक्री त्वरीत बंद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघतना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सोमवारी केली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर रोख न लावल्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर प्लास्टिकच्या फुलांची होळी करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
येत्या रविवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असते. या काळात प्लॅस्टिकच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्‍यता आहे. य ऐवजी फुलांची विक्री झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. दोन पैसे मिळतील, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ऍड. योगेश पांडे म्हणाले, मागील काही वर्षांपासून प्लॅस्टिक फुलांची विक्री वाढली आहे. जास्वंद, मोगरा आदी प्रकारातील हुबेहुब प्लॅस्टिकची फुले बाजारात येत असल्याने खऱ्या फुलांना मागणी घटली आहे. त्याचा परिणाम अत्यल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसानीला सामोर जावे लागत आहे. तर मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबा जाधवराव म्हणाले, एकीकडे प्लॅस्टिक बंदी असताना शहरात चीनी बनावटीच्या प्लॅस्टीकच्या फुलांची सरासपणे विक्री सुरू आहे. संबंधित फुले हलक्‍या जाडीच्या प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आली आहेत. कृत्रिम रंगाचा वापर केलेली ही फुले बायोडिग्रेडेबल ही नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या फुलांवर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. सध्या वाढत चाललेल्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या साम्राज्याला न रोखल्यास अल्पभूधारक शेतकरी संपून जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)