महाराष्ट्र सरकारने अलीकडेच प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. खरे पाहता फ्लस्टिकची समस्या एकट्या महाराष्ट्राची नाही; अवघे जग आज प्लॅस्टिकच्या विळख्यात सापडले आहे. प्लॅस्टिकचा कचरा ही जगातील एक सार्वत्रिक समस्या आहे. विशेषतः पाण्याच्या बाटल्यांसारख्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्नच असतो.

दरवर्षी सुमारे 30 लाख टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असतो. अलीकडील काळात फ्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषतः फ्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर विविध कारणांसाठी केला जात आहे. हे केवळ भारतातच घडतंय असं नाही, परदेशात तर फ्लॅस्टिकच्या पुनर्वापराबाबत अनेक क्‍लृप्त्या लढवल्या जात आहेत.

वाढत्या प्लॅस्टिक कचऱ्यावर उपाय म्हणून कॅनडातील रॉबर्ट बेजाऊ याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा वापर करून एक भव्य आणि सुंदर इमारतच बनवली! सुमारे 40 हजार प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर करून त्यांनी ही इमारत बनवली आहे. अद्याप या इमारतीचे काम सुरू असून ते या वर्षअखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर तिचा वापर हॉलिडे रिसॉर्ट म्हणून केला जाईल.

एकदा एका बेटावर फैलावलेला प्लॅस्टिक कचरा पाहून त्यांना ही कल्पना सूचली होती.
त्यांनी ही इमारत एखाद्या जुन्या किल्ल्यासारखी बनवली आहे. प्लॅस्टिकचा कचरा आणि पऱ्यावरणाची हानी याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून इमारत कशी बनवावी, याचे शिक्षणही देण्याचे त्यांनी ठरवले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)