प्लॅंक्‍सने कमी करा बेली फॅट्‌स…

आजकालच्या तरुणाईला फ्लॅट बेली आणि सिक्‍स पॅक अॅब्सचे भयंकर वेड आहे. परफेक्‍ट बॉडी बनवण्यासाठी तरुण-तरुणी जिम जॉईन करणे, पर्सनल ट्रेनर नेमणे असे अनेक महागडे उपाय करताना दिसतात. परंतु एकही रुपया खर्च न करता ‘प्लॅंक्‍स’ या सोप्या व घरच्या-घरी करता येणाऱ्या व्यायामाद्वारे आपण बेली फॅट्‌स झपाट्याने कमी करू शकतो. विशेष म्हणजे ‘प्लॅंक्‍स’ व्यायाम प्रकार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंस्ट्रुमेंटची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात ‘प्लॅंक्‍स’ विषयी…

‘प्लॅंक’ करताना सर्वप्रथम तुम्हाला आपले कोपर जमिनीवर टेकवावे लागतील त्यानंतर पाय पूर्णपणे लांब करून टाचांच्या व कोपरांच्या भारावर तुम्हाला तुमचे शरीर जमिनीपासून वर उचलावे लागेल. या अवस्थेतेमध्ये सुरुवातीला साधारणपणे तीस सेकंदांसाठी शरीराला बॅलन्स करावे त्यानंतर या व्यायाम प्रकारात-सेकंदांची वाढ करून जास्तीत-जास्त एक मिनिटांपर्यंत ‘प्लॅंक्‍स’ करावेत.

प्लॅंक्‍स हा व्यायाम प्रकार करताना लक्षात ठेवावे की हा व्यायाम प्रकार ‘रिपीटेशनशी’ नाही तर ‘टाइमशी’ निगडित आहे म्हणजेच जितका जास्त वेळ तुम्ही शरीराला बॅलन्स करू शकाल तितका जास्त फायदा तुम्हाला या व्यायाम प्रकारातून होईल.

– संदीप कापडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)