प्लास्टिक साठा पडला महागात

पिंपरी – दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे प्लास्टिकचा साठा करुन ठेवणाऱ्या भोसरी परिसरातील तीन व्यावसायिकांवर इ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात विघटन न होणारे प्लास्टिक व थर्माकॉल बंदी झालेले उत्पादन आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई सुरु आहे. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक वापणाऱ्या भोसरी मधील 3 व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सहा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अभिजीत गुमास्ते, आरोग्य निरीक्षक चंद्रकांत रोकडे, राजू साबळे आणि शंकर घाटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरल्याचे आढळल्यास प्रथम पाच हजार, दुसऱ्यांदा 10 हजार, तिसऱ्यांदा 25 हजार रुपये आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. महापालिकेकडून अनधिकृतपणे प्लास्टिक अथवा थर्माकोलचा साठा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महापालिकेने हा साठा संकलित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर संकलन केंद्र देखील उभारली होती. असे असतानाही अद्याप व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा साठा केला जात आहे. तो त्यांनी नष्ट करावा. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, साठा, विक्री व वापर बंदी अंतर्गत यापुढेही कारवाई सुरु राहणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)