प्लास्टिक वापरणारांकडून 13 लाख रुपये दंड वसूल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर धडक कारवाई करीत आहे. 1 एप्रिल ते 28 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत प्लास्टिक वापरणाऱ्या 263 दुकानदारांकडून 13 लाख 55 हजार रुपये दंड वसूल केला व 10 हजार 511 किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केले, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांनी दिली. 23 मार्चला राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत दिली होती. प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या या वस्तूंना बंदी घातली आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लास्टिक व थर्माकोल वापरणाऱ्या दुकानांची तपासणी केली जात असून त्यामध्ये सातत्य ठेवले आहे. नागरीक, दुकानदार, व्यापारी यांना वारंवार सूचना देऊन व दंडात्मक कारवाई करुनही अद्याप प्लास्टीक व थर्माकॉलचा वापर सुरु असल्याचे दिसून येते. त्यामुळे पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास 5 हजार रुपये, दुसऱ्यांदा आढळल्यास 10 हजार आणि तिसऱ्यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार रुपये व तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. प्लास्टिक व थर्माकॉल आढळल्यास संबंधितावर नियमानुसार दंड व गुन्हा दाखल करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)