प्लास्टिक बंदीला स्थगितीस नकार

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
प्लास्टिक बंदीच्या विरोधात विविध प्लास्टिक उत्पादक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. ‘प्लास्टिकबंदी कधी ना कधी तर लागू करावीच लागेल. सरकारचा २३ मार्चचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी बंदी अत्यावश्यकच आहे’, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ई. पी. भरुचा यांनी केला. तर, ही बंदी बेकायदा असल्याचा युक्तिवाद उत्पादकांतर्फे करण्यात आला. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठानं आज यावर निकाल देताना प्लास्टिक बंदी योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)