प्लास्टिक बंदीबाबत नगरसेविकेची जनजागृती

पिंपरी – राज्य शासनाने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाची भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पिंपरी भाजी मंडईत विक्रेत्यांशी संवाद साधून जनजागृतीसाठी केली.

प्लास्टिक व थर्माकोल जमा करून राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी महापालिकेच्या अ प्रभागाचे अध्यक्ष व नगरसेवक केशव घोळवे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी भाजी मंडईतील भाजी, फळे विक्रेत्यांकडील प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

अनुराधा गोरखे म्हणाल्या की, प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सुरू आहे. त्यासाठी जनजागृती व प्लास्टिक संकलन मोहीम देखील सुरू आहे. भाजी मंडईतील भाजी, फळ विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून महापालिकेला सहकार्य करावे आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)