प्लास्टिक बंदीची तीन महिने कठोर अंमलबजावणी नाही

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : प्लास्टिक वस्तूच्या उत्पादकांशी चर्चा करून मार्ग


सरकार दोन वर्षात 72 हजार पदे भरणार

मुंबई – पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदी आवश्‍यक असून या निर्णयाला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली. मात्र, प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती प्लास्टिक वस्तूच्या उत्पादकांशी चर्चा करून मार्ग काढेल. पर्यायी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत पुढील तीन महिने फार कठोरपणे याची अंमलबजावणी केली जाऊ नये , असा मार्ग निघू शकेल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विरोधी पक्षांच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घाईघाईने व पुरेशी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता घेतल्याने याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात दोन वर्षांत 72 हजार पदे भरण्यात येणार असून यावर्षी 36 हजार पदे भरण्यात येतील. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात 10 हजार 568, ग्रामविकास विभाग 11 हजार पाच, कृषी विभाग 2572, पशु संवर्धन 1047, मत्स्य विकास 90, गृहविभाग 7111, सार्वजनिक बांधकाम 8337, जलसंपदा विभागात 8227 जलसंधारण विभागात 4 हजार 223 व नगरविकास विभागातील 1500 पदांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)