प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई

क क्षेत्रिय कार्यालय ः नागरिकांना सहकार्याचे आवाहन

पिंपरी, (प्रतिनिधी) – गुढी पाडव्यापासून प्लास्टिक पिशव्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर मंगळवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत प्रबोधन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत क क्षेत्रिय कार्यालयामार्फत मोहिम राबविण्यात येत आहे.

शासनाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कागदी पिशव्यांचा वापर करावा असा आदेश काढला आहे. बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्या वापरण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 20) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. इंद्रायणीनगर, भोसरी परिसरातील व्यावसायिकांकडून सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आयुक्‍त श्रावण हर्डीकर, सह आयुक्‍त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक विनोद दवाळे, आरोग्य मुकादम दगडु लांडगे, राजेश जाधव व सचिन गव्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. व्यावसायिक, दुकानदार, नागरीक यांनी कॅरीबॅगचा वापर करु नये, असे प्रबोधन करण्यात आले. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत ठेवावी, व्यवसायिकांकडे, टपरीधारक, पथारीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांकडे कॅरीबॅगचा आग्रह धरु नये. कापडी पिशवीचाच वापर करावा. सर्व नागरिकांनी आपले शहर प्लास्टिक पिशवी मुक्‍त व स्वच्छ भारत, स्वच्छ पिंपरी-चिंचवड करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)