प्लास्टिकमुक्त प्रभाग करण्याचा निर्धार

वाकड – वाढते प्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, यासाठी आपला प्रभाग प्लास्टिक मुक्‍त करू, असा निर्धार प्रभाग क्रमांक 26 वाकड-पिंपळे निलख येथील नागरिकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवक संदिप कस्पटे यांनी केलेल्या आवाहनानंतर प्लास्टिकमुक्‍त प्रभागासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक मुक्‍त प्रभाग जनजागृती अभियाना दरम्यान सामुहिक शपथ घेण्यात आली.

कै. मारुती गेनू कस्पटे मनपा शाळा क्रमांक 59, कस्पटेवस्ती, ज्येष्ठ नागरीक संघ, पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशन, कस्पटेवस्ती व्यापारी असोसिएशन, सिजा फाऊंडेशन, महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने प्लास्टिक पिशवी मुक्‍त या विषयावर जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानात बोलताना नगरसेवक कस्पटे म्हणाले की, पर्यावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यास योग्य असे व्यवस्थापन न केल्यास भविष्यात गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी प्लास्टिकमुक्‍त प्रभाग केला पाहिजे.

-Ads-

यावेळी नगरसेविका आरती सुरेश चौंधे, ममता गायकवाड, नगरसदस्य तुषार कामटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे, फेडरेशन अध्यक्ष सुरेश राजे, महेंद्रसिंग राजपूत, जयसिंग चिने, अरुण पाटोळे, सुधीर देशमुख, मुकुंद कुकडोलकर, विनोद डेरे, डी.एस.धुपे, नाना पाटील, विष्णु खाचणे, मनीष नांदगावकर, विकास पाटील, गणेश कस्पटे, मोहन कस्पटे, विकास कस्पटे, तानाजी शेंडगे, कपिल गुप्ता, सचिन लोंढे, विनायक पाटील शाळेचे शिक्षक-विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.

नगरसेवक कस्पटे म्हणाले की, प्रभागातील पर्यावरण समतोल साधण्यासाठी प्रत्येक दुकानदारांनी व ग्राहकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे, कारण त्यावर पुर्नप्रक्रिया होत नाही व निसर्गाचा समतोल ढासळतो. अभियान फेरीचा समारोप प्लास्टिक मुक्‍त शपथ घेऊन करण्यात आला. प्रस्तावना ज्येष्ठ विचारवंत अरुण देशमुख यांनी केली, संयोजन प्रभाग अध्यक्ष प्रसाद कस्पटे, विलास कुटे यांच्यासह राम लाभे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी प्रभागातील नागरिकांनी दुकानात जाऊन जाहीर आवाहनाचे पत्र दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)