प्लास्टिकमुक्तीसाठी ब्रिटनची अभिनव योजना

लंडन (ब्रिटन) -प्लास्टिक कचरामुक्तीसाठी ब्रिटनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक अभिनव योजना लागू करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या हानिकारक परिणामांपासून बचाव आणि रस्त्यावरील प्लास्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रणासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत एटीएममधून बिना एटीएम कार्ड पैसे मिळणार आहेत. आरव्हीएम (रिव्हर्स व्हेंडिग़ मशीन नावाची एटीएम मशीन एटीएम कार्डद्वारा नाही, तर प्लास्टिकच्या बाटल्या वा प्लास्टिकचे कॅन टाकल्यानंतर पैसे देणार आहे. ही रक्कम म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंगची किंमत आहे. प्लास्टिकच्या बाटल्या आणि कॅन जमा करण्यास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामुळे 60 ते 85 टक्के प्लास्टिक रिसायकलिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

ब्रिटनचे पर्यावरण सचिव मायकेल गव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार पेयांचे कॅन आणि बाटल्यांवर नाममात्र किंमत आकारण्यात येणार आहे. या रिकाम्या बाटल्या आणि कॅन्स या एटीएम मशीन मध्ये घातल्यानंतर त्यांची किंमतन्‌ परत मिळणार आहे. अशीच योजना नॉर्वेमध्ये आणि जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इस्रायलमध्येही राबवण्यात येत आहे. ब्रिटनचे उप पर्यावरण मंत्री थेरेसी कॉफे यांनी या योजनेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या महिन्यात नॉर्वेचा दौरा केला होता. यात प्लास्टिकच्या बाटल्यांप्रमाणेच काचेच्या आणि अल्युमिनियमच्या बाटल्यांचाही समावेश असावा अशी मागणी असून त्यामुळे ही योजना अधिक सफल होईल असे त्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)