प्लास्टिकच्या वापरावर उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी समिती

मुंबई : प्लास्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.

या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बल्गन यांचा समावेश आहे. ही समिती उद्योजकांनी मांडलेल्या मुद्यांचा अभ्यास करुन प्लास्टिक बंदीबाबत शासनाने नियुक्त केलेल्या  समितीला (High power Committee) आपला अहवाल सादर करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)