#प्रो कबड्डी : हरयाणा स्टीलर्सवर बेंगलुरू बुल्सचा एकतर्फी विजय

प्रो कबड्डी मध्ये बुधवारी पुणे लेगच्या शेवटच्या दिवशी पहिला सामना बेंगलुरू बुल्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स यांच्यात झाला. हा सामना बेंगलुरु बुल्स यांनी ४२-३४ असा जिंकला. पवन कुमार आणि रोहित कुमार या बुल्सच्या खेळाडूंची उत्तम रेडिंग या सामन्याचे वैशिष्ट ठरले.

पहिल्या सत्राची सुरुवात दोन्ही संघांसाठी उत्तम झाली. दोन्ही संघांनी त्यांच्या दुसऱ्या रेडमध्ये गुण मिळवले. त्यानंतर एकवेळ गुण संख्या २-२ अशी बरोबरीत आली. सामन्यातील १५ मिनिटे झाली तेव्हा दोन्ही  संघ १०-१० असे बरोबरीत होते. पहिल्या सत्रातील शेवटचे दोन मिनिटे बाकी राहिली होती तेव्हा हरयाणाकडे ११-१३ अशी आघाडी होती. त्यानंतर पहिले सत्र संपले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सत्राची सुरुवात बुल्ससाठी चांगली झाली. पवन कुमारने सुपर रेड करत हरयाणाला ऑल आऊटच्या जवळ घेऊन आले. त्यानंतर हरयाणाचा संघ ऑल आऊट झाला आणि बुल्सने सामन्यात २१-१७ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्राच्या १२ व्या मिनिटाला पुन्हा हरयाणाचा संघ ऑल आऊट झाला. बुल्स संघाची आघाडी 32-23 अशी झाली. शेवटी हा सामना बुल्स संघाने ४२-३४ असा जिंकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)