प्रो कबड्डी: नितीन तोमर ठरला सहाव्या मोसमातील पहिला शतकवीर

पटणा – प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात 39 वा सामना पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात फॉर्च्युनजायेन्ट्‌स यांच्यात झाला. हा सामना गुजरातच्या संघाने 37-27 असा जिंकला. यामध्ये गुजरातची सचीनने सुपर टेन करत गुजरातच्या संघाला विजय मुळवून दिला तर पुणेरी संघासाठी नितीन तोमर याने 6 रेडींग गुण कमविले.

पुणेरी पलटणचा मुख्य रेडर नितीन तोमरने या सामन्यात चार रेडींग गुण मिळवत या मोसमात प्रथम 100 गुण मिळविणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ही विक्रमी कामगिरी केली असली तरी तो संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला. त्याने या मोसमात खेळताना 11 सामन्यात 102 गुण मिळवले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नितीनने मिळविलेल्या 102 गुणांमधील 100 गुण त्याने रेडींगमध्ये मिळविले आहेत. त्यामुळे या मोसमात फक्त रेडींगमध्ये देखील 100 गुण मिळविणारा नितीन हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ सर्वाधिक गुण मिळविणारा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये प्रथमच खेळणारा खेळाडू सिद्धार्थ देसाई आहे. त्याने फक्त 7 सामन्यात 98 गुण मिळविले आहेत. त्यातील 97 गुण रेडींगमधील असून 1 गुण त्याने फेडेन्समध्ये मिळविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)