प्रॉपर्टी न जन्मलेल्या बाळाची (भाग-१)

विशिष्ट परिस्थितीत जी व्यक्ती हस्तांतरावेळी अस्तित्वात नाही, अशा व्यक्तीच्या नावावरही संपत्तीचे हस्तांतर करता येते. म्हणजेच, हस्तांतरावेळी जन्मास न आलेल्या अपत्याच्या नावावर संपत्ती करता येते. मात्र त्यासाठी अगोदर ट्रस्टस्थापन करावा लागतो व तात्पुरते अधिकार त्यांच्याकडे दिले जातात.

संपत्तीचे हस्तांतरण करणे किंवा ती एखाद्याच्या नावावर करणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे; परंतु अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावावर संपत्ती करता येते का, हा प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ऍक्‍ट अर्थात संपत्ती हस्तांतर कायद्यानुसार (1882) संपत्ती केवळ जीवित व्यक्तीच्या नावावरच हस्तांतरित करता येते. अर्थात, या कायद्यात अशीही तरतूद आहे की, विशिष्ट परिस्थितीत जी व्यक्ती हस्तांतरावेळी अस्तित्वात नाही, अशा व्यक्तीच्या नावावरही संपत्तीचे हस्तांतर करता येते. म्हणजेच, हस्तांतरावेळी जन्मास न आलेल्या अपत्याच्या नावावर संपत्ती करता येते. त्यासाठी काही मार्ग सांगण्यात आले आहेत आणि अशी विशिष्ट परिस्थिती ज्यांच्या बाबतीत उद्‌भवते, त्यांनी या मार्गांची माहिती करून घेणे आवश्‍यक ठरते.

प्रॉपर्टी न जन्मलेल्या बाळाची (भाग-२)

अद्याप न जन्मलेल्या अपत्याच्या नावावर संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी आधी एक ट्रस्ट स्थापन करावा लागतो. या ट्रस्टच्या माध्यमातून अशा अपत्याला भविष्यात संबंधित संपत्ती मिळू शकते. संपत्ती हस्तांतरित करण्याच्या तारखेला एखाद्या जीवित व्यक्तीच्या नावावर संपत्ती करण्यात येते. कारण जोपर्यंत अपत्य जन्मास येत नाही, तोपर्यंत एखाद्या जीवित व्यक्तीकडेच संपत्तीचे अधिकार असावे लागतात. अशा जीवित व्यक्तीच्या नावाने “लाइफ इस्टेट’ तयार करता येते. त्यानंतर संपत्तीवर त्यावेळी जन्माला न आलेल्या एखाद्या अर्भकाचा हक्क भविष्यात असू शकतो किंवा ट्रस्टीची नियुक्तीही केली जाऊ शकते. हा ट्रस्टी जन्माला न आलेल्या अपत्याच्या वतीने मालमत्तेची देखभाल करतो. या प्रक्रियेचे उदाहरण द्यायचे झाल्यास, “क’ व्यक्ती तिची मालमत्ता बक्षीसरूपाने “ख’ या व्यक्तीच्या नावाने आणि “ख’ व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या सर्वांत मोठ्या अपत्याच्या नावाने (जे अद्याप जन्मलेले नाही) करू शकते.

– कमलेश गिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)