प्रॉपर्टी कार्डवर 25 दिवसांत नोंद

जमाबंदी आयुक्‍तांचा निर्णय 


तत्पर सेवा देण्यासाठी एक पाऊल

पुणे- गावठाण आणि नागरी भागातील जमीन किंवा सदनिका यांची खरेदी-विक्री झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदाराची नोंद होण्याचा कालावधी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कमी केला आहे. त्यानुसार जर संबधित मिळकतीबाबत काही वाद नसेल, तर 25 दिवसांत खरेदीदारांची नोंद प्रॉपर्टी कार्डवर येणार आहे. पूर्वी या नोंदीसाठी 30 दिवसांचा कालावधी लागत होता. “ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत तत्पर सेवा देण्यासाठी हा कालावधी कमी करण्यात आला आहे.

राज्यातील शहरांमध्ये भूमी अभिलेख विभागाकडून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. सध्या पुणे शहरात सदनिका अथवा जमिनीच्या खरेदी -विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर दस्ताची प्रमाणित प्रत घेऊन भूमी अभिलेख विभागात जाऊन सादर करावी लागते. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून नोटिसा काढून 30 दिवसांची मुदत दिली जाते. मुदतीत यावर हरकत दाखल झाली नाही. तर त्यानंतर प्रॉपर्टी कार्डावर संबंधित खरेदीदारांची नोंद घातली जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणास लागणार वेळ लागतो. फेरफार नोंदीसंदर्भात काही वाद नसल्यास 30 दिवसात नोंद घेण्यात येत होती. नागरिकांना “ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत तत्पर सेवा देण्याकरिता हा कालावधी कमी करण्याबाबतची बाब भूमि अभिलेख विभागाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भूमि अभिलेख विभागाने फेरफार नोंदी संदर्भात वाद अथवा हरकत नसल्यास त्याची नोंद 25 दिवसात घेण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचे अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर संबंधित मिळकतीच्या मिळकतपत्रिकेवर मालकी हक्काची नोंद घालण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत होणार आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर दस्त नोंदणी विभागाकडून लगेच एक ईमेल भूमी अभिलेख विभागाला पाठविला जाणार आहे. त्या मेलचा आधार घेऊन संबंधित जमीन अथवा सदनिकेच्या मिळकतीवरील मालकी हक्काची खात्री भूमी अभिलेख विभागाकडून केली जाईल. ती खात्री झाल्यानंतर लगेच नाव नोंदणीसाठीची नोटीस तयार करण्यात येणार आहे. नोटिशीची मुदत संपल्यानंतर जर याबाबत कुणाचाही हरकत नसेल तर प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदाराच्या नावाची नोंद घातली जाणार आहे. त्यासाठी खरेदीरांना भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)