प्रॉडक्‍ट लीडरशिपमधून बदलत्या मार्केटशी समन्वय साधा

लोणी काळभोर- पारंपरिक पद्धतीने व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण न घेता आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. जगात नव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक फेरबदल होत आहेत. प्रॉडक्‍ट लीडरशिपमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापकांमध्ये नेतृत्व कौशल्याची निर्मिती करत बदलणाऱ्या मार्केटशी समन्वय साधणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिपचे संचालक प्रा. डॉ. पिंकेश शहा यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट (मीटकॉम) आणि इन्स्टिटट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिप यांच्या वतीने आयोजित प्रॉडक्‍ट लीडरशिप कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, प्रा. डॉ. विवेक सिंग, प्रा. छबी सिन्हा आदी उपस्थित होते.
डॉ. शहा म्हणाले, कंपनीच्या योजना तयार करणे आणि अंमलबजावणी कौशल्ये विकसित करण्यासाठी या शिक्षणाचा लाभ होणार आहे. कंपन्यांमध्ये कार्यकारी भूमिकांसाठी आवश्‍यक असलेल्या नेतृत्व क्षमतांना सक्षम करण्यासही यामुळे मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेंडच्या साह्याने बदलणाऱ्या मार्केटशी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. आमचा प्रोग्राम व्यावसायिकांना शिकण्याचा आणि त्यांना सक्षम करण्यास मदत करतो. नवीनतम तंत्रज्ञानातून जास्त लाभ कंपन्यांना व्हावा हा यामागील हेतू आहे.
प्रा. सुनीता कराड म्हणाल्या, इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉडक्‍ट लीडरशिप आणि एमआयटी मिटकॉमच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे. भविष्यातील गरज ओळखून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. वैयक्‍तिक ध्येय साध्य करण्यासाठी आणि कंपन्यांचे हित साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या पद्धतीनुसार आपण बदलणे आवश्‍यक आहे. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अजीज शेख आणि प्रा. प्राची अहिरराव यांनी केले. प्रा. छबी सिन्हा यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)