प्रेरणा सहकारी बॅंकेची कात्रजमध्ये चौदावी शाखा

पिंपरी – थेरगाव येथील प्रेरणा सहकारी बॅंकेची कात्रजमध्ये चौदावी शाखा नुकतीच सुरू करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे संस्थापक तुकाराम गुजर होते. पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते एटीएम सुविधेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष आप्पा रेणुसे, बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उपाध्यक्ष गबाजी वाकडकर, नगरसेवक स्मिता कोंढरे, विशाल तांबे, युवराज बेलदरे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य बाळासाहेब गरुड, पीडीसीसीचे संचालक भालचंद्र जगताप, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बेलदरे, आप्पा दावणे, श्रीरंग आहेर आदी उपस्थित होते.

कांतीलाल गुजर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर यांनी आभार मानले. बॅंकेच्या पालक संचालिका मीना शेळके, लक्ष्मण काटे, श्रीधर वाल्हेकर, अंकुश पऱ्हाड, सुरेश पारखी, राजाराम रंदील, संजय पठारे, राजेंद्र शिरसाठ, उमेश आगम, सुजाता पारखी, नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रभागा भिसे यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)