प्रेरणा : महिला स्वयंसहायता   

दत्तात्रय आंबुलकर 
ओडिशातील महिला स्वयंसहायता गट सदस्यांनी स्थानिक महिलांच्या माध्यमातून आपापल्या गावांमध्ये स्वच्छता, शौचालय, पाणीपुरवठा व विजेची सुविधा या माध्यमातून लक्षणीय परिवर्तनाचे लक्षणीय काम केले आहे.
दर शनिवारी भल्या पहाटे ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वरपासून 350 किलोमीटर्सवर असणाऱ्या छोटेखानी गजपती जिल्ह्याच्या गौंडांग-गोरजांग या गावचे सारे गावकरी गावाच्या मध्यवर्ती स्थानावरील चौकात एकत्र येतात. त्यानंतर साऱ्या गावकऱ्यातून तीन गट तयार करून सर्वजण आपापल्या कामाला लागतात व हे काम असते गावचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व नाल्यांच्या साफसफाईचे. दर आठवड्याला हा उपक्रम सुरू असतो. याचा गाव आणि गावकरी या दोन्हीवर अर्थातच सकारात्मक स्वरूपात परिणाम झाला आहे.
त्यानंतर घरी जाऊन आपला दिनक्रम सुरू करण्यापूर्वी या गावच्या महिला आपल्या स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून गावातील अंगणवाडीत आवर्जून उपस्थित असतात. या सत्रात अंगणवाडीसेविका गावच्या महिलांना बाल आरोग्य, महिलांची निगा, सकस आहार, शिक्षणाचे- प्रौढ शिक्षणाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करतात व त्याची अंमलबजावणी स्थानिक महिला करीत असतात. या उपक्रमात गावातील 57 कुटुंबातील 260 सदस्य सहभागी होतात. या उपक्रमात गौंडांग-गोरजांगच्या गावकऱ्यांनी महिलांच्या पुढाकाराने व त्यांच्या स्वयं-सहाय्यता गटाच्या माध्यमातून प्रयत्न केल्याने त्यांचे दृष्य व सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसू लागले आहेत हे विशेष.
आज साऱ्या प्रयत्नांचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत. आज गौडांग-गोरजांग गावात स्वच्छ रस्ते व नाल्याचं नव्हेत तर स्वच्छ पाणी, वीज पुरवठा, एलपीजीच्या चुली हे सारे दिसून येते. गावातील हे परिवर्तन घडले ते महिला स्वयंसहायता क्षेत्रात काम करणाऱ्या ओरिसातील “प्रेम’ म्हणजेच पीपल्स रुरल एज्युकेशन मूव्हमेंट या स्वयंसेवी संस्थेमुळे, संस्थेला एका बॅंकेने वित्तीय सहाय्य देऊ केले आहे. आपल्या या प्रयत्नांना पहिल्याच टप्प्यात यश लाभल्याने प्रेरित झाल्याने “प्रेम’ने गौडांग-गोरजांग गावाला आदर्श गाव बनविण्याचा ध्यास घेतला असून हे काम पण संस्थेने गावच्या महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून करण्याचा संस्थेचा निर्धार असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
या नव्या ग्राम आदर्श प्रयत्नांमध्ये गावात संपूर्ण तंटामुक्ती, संघर्ष समाप्ती, तंबाखू व दारूचे उच्चाटन इ.चा समावेश करून गावातील गरजू लोकांना रोजगार व उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून त्याद्वारा गावकऱ्यांचे संपूर्णपणे गावातच पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तातडीने हाती घेण्यात आला आहे.
“प्रेम’च्या या साऱ्या प्रयत्नांचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्लक्षित गावकऱ्यांमध्ये स्थानिक रहिवासी व महिलांच्या माध्यमातून संपूर्ण परिवर्तन घडवून आणणे हा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना ओडिशाच्या गौडांग-गोरजांग या गावात केवळ महिलाच नव्हे तर संपूर्ण गावकऱ्यांनी गावकीच्या स्वरूपात प्रयत्न करून गावात पिण्याच्या पाण्यापासून शिक्षण, स्वच्छता, सामाजिक सुधारणा इ. विविध क्षेत्रांत जे परिवर्तन घडवून आणले त्यापासून प्रेरणा घेऊन राज्याच्या अन्य भागात पण आपल्या सामाजिक परिवर्तनाचा प्रेम संदेश देण्यावर आता “प्रेम’चा भर राहणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)