प्रेरणा : चहावाल्याला पद्मश्री पुरस्कार

दत्तात्रय आंबुलकर

वर्ष 2019 च्या गणतंत्रदिनी जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांतर्गत काही विशेष पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या नावामध्ये एक विशेष नाव म्हणून ओडिशाच्या कटक येथे राहणाऱ्या डी. प्रकाश राव यांचा विशेष समावेश करावा लागेल. डी. प्रकाश राव यांच्यासंदर्भात विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे ज्यांना देशातील लोक फारसे ओळखतही नाहीत तरीसुद्धा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतून त्यांचे कार्य सुटले नाही व त्यामुळेच एका सर्वसामान्य चहावाल्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा या पुरस्कार यादीत समावेश करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भातील विशेष म्हणजे ओडिशातील कटक येथे राहणारे डी. प्रकाश राव हे गेल्या 67 वर्षांपासून चहा विकण्याचे काम करीत असून विशेष म्हणजे प्रकाश राव हे चहा विकून त्यांना मिळालेल्या पैशातील अधिकांश म्हणजेच 90% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करतात. डी. प्रकाश राव यांच्या या आगळ्यावेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण व सातत्याने सुरू असणाऱ्या योगदानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रभावित होऊन त्यांची आवर्जून दखल तर घेतली होती. त्याशिवाय 30 मे 2018 रोजी त्यांच्या झालेल्या त्यांच्या “मन की बात’ या विशेष संवाद कार्यक्रमात प्रकाश राव यांच्या कामाची विशेष प्रशंसाही केली होती हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

आपल्या या विशेष उपक्रमांतर्गत डी. प्रभाकर राव यांनी जी मुले त्यांच्या कौटुंबिक वा आर्थिक परिस्थितीमुळे शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही अशा 60 हून अधिक मुलांना शिकविण्याचे महनीय काम सुरू ठेवले आहे. प्रामुख्याने प्रकाश राव चहा विकून त्यांना होणाऱ्या कमाईतून झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत शाळा चालवितात. याशिवाय रोज रुग्णालयात जाऊन तिथे रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सेवा करतात. गरजू रुग्णांना गरम पाणी पण त्यांच्यातर्फे दिले जाते. ही सारी कामे ते दररोज करतातच शिवाय गरजेनुसार स्वतः रक्तदान करून इतरांना पण रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात. मुख्य म्हणजे स्वतः औपचारिक शिक्षण न घेतलेले डी. प्रभाकर राव हे ओडिसी भाषेशिवाय इंग्रजी व हिंदी उत्तम प्रकारे बोलू शकतात. आपल्या या भाषाविषयक ज्ञानाचा उपयोग आपल्या चहा विक्रीतून मिळणाऱ्या राशीच्या जोडीला करतात. समाजसेवी चहावाल्याला मिळणारी यावर्षीची पद्मश्री म्हणूनच अनेकार्थांनी प्रेरणादायी ठरते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)