प्रेरणा: ग्राहक शेतकऱ्यांचे सफल संबंध 

दत्तात्रय आंबुलकर 
नित्याच्या ग्राहकोपयोगी उत्पादन-वस्तूंपैकी भाजी-पाला, फळे व अन्य खाद्य वस्तू आपल्याला चांगल्या दर्जाच्या व स्वच्छ स्वरूपात कशा मिळतील? या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर चर्चा तर सर्वचजण करतात, मात्र त्यावर उपाययोजना मात्र कुणी करत नाहीत. 
हैद्राबादमधील दिशा ग्राहक संघटनेच्या सुमारे 100 सदस्यांनी यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. दिशा ग्राहक संघटना सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देते. संघटनेतर्फे शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येते. दिशा संस्थेचे अधिकांश सदस्य हे शहरवासी असल्याने संख्येने आपले सदस्य व धान्य-भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्यात परस्पर सहकार्याच्या माध्यमातून हैदराबादच्या सदस्य-ग्राहकांमध्ये समन्वय साधून सेंद्रीय कृषी उत्पादनांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना सेंद्रीय व गुणवत्तापूर्ण भाजीपाला-धान्य अधिक प्रमाणात उत्पादित करून त्याची थेट विक्री सदस्य-ग्राहकांना करण्यासाठी व्यवस्था व योजनेची यशस्वी अंमलबजावणी केली.
यासाठी करण्यात आलेले “दिशा’चे दिशादायक प्रयत्नांचे स्वरूप अगदी सुटसुटीत ठेवण्यात आले. संस्थेने आपल्या सदस्यांमधून ज्या ग्राहक-सदस्यांनी नेहमी व कायमस्वरूपी सेंद्रीय, स्वच्छ फळे- भाजीपाला मिळावा अशा मंडळींचा शोध घेतला. त्यानुसार सुमारे 100 सदस्यांनी त्याला आर्थिक योगदानासह प्रतिसाद दिला. दिशा संस्थेने हैदराबादजवळच्या काही गावातील निवडक शेतकऱ्यांशी संपर्क साधून, त्यांच्याशी संवादाद्वारे शेतकरी-ग्राहक यांच्यातील परस्पर हितकारी अशी ही संकल्पना मांडली. या कल्पनेला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद तर दिला. पण काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीपद्धतीद्वारा कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्‍त केली.दिशाच्या सदस्य-ग्राहकांनी त्याला तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिला.
संस्थेने आपल्या प्रयत्नांच्या परिणामकारकतेसाठी या उपक्रमात सुरुवातीपासूनच महिलांना समाविष्ट केले. शेतकरी उत्पादक व शहरी ग्राहक या दोन्ही भूमिकांमध्ये महिलांची संख्या नेहमीच मोठी असल्याने शेतकरी-ग्राहक म्हणून महिलांनी एकमेकांना अल्पावधीतच व सहकार्यांच्या भावनेने एकमेकाला परस्पर सहकार्य दिले. विशेषतः सण-प्रसंगी या महिला एकमेकांना आवर्जून भेटू लागल्या. त्यादरम्यान हैदराबादपासून 120 किमीवरील संगारेड्डी जिल्ह्यातील अर्जुन नायक तांडा या गावी गावच्या प्रत्येक उत्पादक शेतकऱ्याला दिशाच्या सदस्यांनी 12 हजार ते 25 हजारपर्यंत निधी दिशाच्या माध्यमातून दिला. त्याबदल्यात हे शेतकरी संबंधित सदस्याला वर्षभर सेंद्रिय पद्धतीने उत्पादित उत्पादन परस्पर सहकार्याच्या तत्त्वावर देतात. गेल्या वर्षभरात “दिशा’च्या सेंद्रिय कृषी उत्पादन वितरण प्रक्रियेला आता चांगले स्वरूप मिळू लागले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)