प्रेरणादायी ‘हिचकी’

अभिनेत्री राणी मुखर्जी ‘मर्दानी’ नंतर मोठ्या कालावधीने बिगस्क्रीन वर दिसणार आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित  ‘हिचकी’ मधून एका हटके भूमिकेतून तिचे बॉलीवुडमध्ये दमदार पुनरागमन झाले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणतीही ना कोणती कमतरता असते. पण आपल्या कमतरतेवर मात करत काही लोक यश मिळवतात तसेच सामाजिक, आर्थिक परिस्थिति पेक्षा जिंकण्याची जिद्द महत्वपूर्ण असते हे ‘हिचकी’ मधून सांगण्याचा प्रयत्न आहे.
‘हिचकी’ ही नयना मल्होत्रा  (राणी मुखर्जी) ची कथा आहे. नयनाला टॉरेंट सिंड्रोम हा आजार लहानपणापासून असतो. त्यामुळे तिला नेहमीच तिरस्काराचा सामना करावा लागतो. तिचे वडील (सचिन पिळगांवकर) हे देखील तिचा या गोष्टीमुळे तिच्यावर सतत चिडत असतात. तसेच शाळेत असताना वर्गातील मुले देखील तिच्यावर हसत असतात. तिच्या सततच्या उचक्यांमुळे संपूर्ण वर्गाला त्रास होतो असे सांगत तिला तब्बल १२ शाळांमधून काढले जाते. त्यानंतर १३ व्या शाळेतील तिचे खान सर (विक्रम गोखले) तिला या सगळ्या परिस्थितावर मात करायला शिकवतात. त्यांच्यामुळे नयना चांगले शिक्षण घेते. तिच्या या गुरूंमुळे तिलादेखील शिक्षिका बनायचे असते. पण अनेक शाळांमध्ये मुलाखत देऊन देखील तिला नोकरी मिळत नाही.
तिच्या या आजारामुळे ती कधीच शिक्षिका बनू शकत नाही असेच सगळ्यांचे मत असते. पण ती ज्या शाळेत शिकलेली असते, त्या शाळेत तिला अचानक नोकरी मिळते. राईट टू एज्युकेशनच्या द्वारे महानगरपालिकेतील काही मुलांना या शाळेत शिकण्याची परवानगी मिळालेली असते. या मुलांना शिकवण्याची जबाबदारी नयनावर येते. ही मुले अतिशय मस्तीखोर असतात. नयनाने शाळा सोडवावी यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. पण नयना त्यांना कशाप्रकारे सुधारते आणि नयना आणि या मुलाचे नाते कशाप्रकारे उलगडत जाते हे जाणून घेण्यासाठी  ‘हिचकी’ बघायला हवा.
दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी अतिशय नयनाची कथा अतिशय सुंदररित्या मांडले आहे.  नयना आणि तिच्या विद्यार्थ्यांचे नाते तसेच तिचे तिच्या आईसोबत (सुप्रिया पिळगांवकर) आणि भावासोबत (हुसैन दलाल) असलेले नाते खूपच चांगल्याप्रकारे मांडण्यात आले आहे. तसेच नयनाची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धतदेखील खूपच रंजक आहे. मुलांना चार भिंतीच्या वर्गात न शिकवता ती त्यांना प्रात्यक्षिकं देऊन शिकवते. चित्रपट पाहात असताना चित्रपटात पुढे काय घडणार याचा अंदाज आपल्याला येतो तरीही चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही.
कलाकरांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर राणी मुखर्जीचे कौतुक करावे तितके कमी आहे. राणी नयना ही भूमिका अक्षरशः जगली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हर्ष मयार, जन्नत झुबैर रहमानी यांनी चांगला अभिनय केला आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे हा चित्रपट काहीसा स्लो वाटत असला तरी प्रेक्षकांचे पैसे वसूल होतात, हॉलीवुडच्या ‘फ्रंट ऑफ क्लास’ वर आधारित ‘हिचकी’ एकदा बघायला हरकत नाही.
चित्रपट – हिचकी
निर्मिती – आदित्य चोप्रा, मनीष शर्मा
दिग्दर्शक – सिद्धार्थ पी. मल्होत्रा
कलाकार – राणी मुखर्जी, सुप्रिया पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, हुसैन दलाल, हर्ष मयार, जन्नत झुबैर रहमानी
रेटिंग -“”‘
-भूपाल पंडित

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)