प्रेयसीला व्हिडिओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या

उल्हासनगर – प्रेयसीसोबत भांडण झाल्याने प्रियकराने तिला व्हिडिओ कॉल करून गळफास घेऊन आत्महत्या केली. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. हनी असे त्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी तरुणीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनी हा उल्हासनगरमध्ये राहत होता. त्याचे नालासोपारा येथील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे काही कारणांवरून भांडण झाले होते. त्यामुळं तरुणीनं त्याच्यासोबतचं नातं कायमचं तोडण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान, दोघांची एकदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या दोघांमधील भांडण मिटलं होतं. सगळं काही ठिक चाललं असतानाच मे रोजी पुन्हा त्यांच्यात भांडण झालं. त्यानंतर हनीनं त्याच्या खोलीत फास तयार केला आणि तरुणीला व्हिडिओ कॉल करून मी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. पण रागात असलेली तरुणी त्यावेळी तू काय आत्महत्या करशील? हिंमत असेल तर आत्महत्या कर, असं म्हणाली. त्यामुळं निराश झालेल्या हनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हनीचे वडील नरेश आसवानी यांनी रविवारी हिल लाईन पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याऐवजी तिनं त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असं आसवानी यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)