प्रेयसीने विवाहास नकार दिल्याने प्रियकराने केला खून

पुणे – प्रेयसीने विवाहान नकार दिल्याने प्रियकराने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना विमानतळ येथे घडली. संबंधीत तरुणीचा मृतदेह बुधवारी लोहगाव येथील जंगलात आढळला होता. या प्रकरणाचा तपास केल्यावर पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

उमा बबन कापसे (18, रा. खुळेवाडी, चंदननगर), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परमेश्‍वर गंगाधर बोयाळे ( 19, रा. चंदननगर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी परमेश्‍वर व मयत उमा यांच्यामध्ये काही वर्षापासून प्रेम संबंध होते. परमेश्‍वर उमाला विवाह करण्यासाठी मागे लागला होता. मात्र, तो सातत्याने तिच्यावर काहीतरी बंधणे घालत असल्याने त्यांच्यात वादावादी होत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे तिच्या घरच्यांनी तुमच्यामध्ये आत्ताच वादावादी होत असेल तर विवाह करु नका, असा सल्ला तिला दिला होता. तसेच ते तिच्या विवाहासाठी स्थळे बघत होते. याचा राग आरोपीला आला होता. यामुळे उमाला वाढदिवसाची संधी साधून तिला केक कापण्यासाठी बोलावून घेतले. तिला दुचाकीवर बसवून तो लोहगाव येथील जंगलात गेला. तेथे विवाह करण्यावरुन त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. यानंतर त्याने रागाच्या भरात तिला मारहाण करून ओढणीने गळा आवळून खून केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)