प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकरानेही संपविली जीवनयात्रा

महाबळेश्वर, दि. 1 (प्रतिनिधी) – महाबळेश्वर येथील प्रसिद्ध ऑर्थर सीट पॉईंटवरून मंगळवारी सायंकाळी खोल दरीत उडी मारून युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विशाल भाऊसाहेब गायके (वय 21, रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर, सध्या रा. मांडगे वस्ती नांदगाव, ता. कर्जत) असे संबंधित युवकाचे नाव असून प्रेयसीच्या मृत्यूमुळे नैराशेत जाऊन या युवकाने आपली जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली आहे. या घटनेची नोंद महाबळेश्‍वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की, विशाल व त्याची प्रेयसी दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकत होते. त्यांनतर विशालची प्रेयसीने उच्चशिक्षण घेण्यासाठी पुणे येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दरम्यान, तिला कर्करोग झाला. 29 ऑक्‍टोबर रोजी ऑपरेशन करत असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना विशालला कळताच तो कुटुंबियांना मित्राकडे पुण्याला भेटण्यास निघालो आहे असे सांगून प्रेयसीच्या इथे पोहचला. प्रेयसीच्या मृत्यूमुळे नैराश्‍यात गेलेल्या विशालने थेट महाबळेश्‍वर गाठले. नैराश्‍येत बुडालेल्या विशालने बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऑर्थरसीट पॉईंटवरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
दरम्यान, 31 ऑक्‍टोर रोजी विशालचे वडील भाऊसाहेब गायके यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात नोंद केली होती. कर्जत पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन विशाल महाबळेश्‍वर मध्ये असल्याचे शोधून काढले. मात्र, त्यापूर्वीच विशालने आत्महत्या केली होती.
दरम्यान, वडील भाऊसाहेब विठ्ठल गायके यांनी विशालला अनेक वेळा फोन केले होते. परंतु एकही फोन विशाल ने उचलला नाही, तुझे अकाउंट नंबर पाठव मी तुला खर्चासाठी पैसे ट्रान्सफर करतो, असा मेसेजदेखील वडिलांनी त्याला पाठविला होता. परंतु, “सॉरी पप्पा’ अशा आशयाचा मेसेज त्यांना वडिलांना पाठविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)