प्रेयसीचा खून करुन तरुणाची आत्महत्या

पिंपरी – प्रेम प्रकरणातून आदिती शामसुंदर बिडवे (वय- 19) हिचा खून करून नेईमोद्दीन बिल्कोसोदीन शहा (वय-2 1, रा. लातूर) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगवीतील औंध उरो रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये मंगळवार दि. 27 ला दुपारी घडली.

याप्रकरणी अभिनय संजय गायकवाड यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आदितीचे वडील लातूर येथील सरकारी इस्पितळात वैद्यकीय अधिक्षक म्हणून कामाला होते, तर नेईमोद्दीनची आई ही तेथे स्वयंपाकाचे काम करत होती. यावेळी नेईमोद्दीन व आदितीची ओळख झाली व त्यांच्यात प्रेम झाले. पुढे आदितीच्या वडिलांची नांदेडच्या सरकारी रुग्णालयात बदली झाल्याने चार महिन्यांपासून आदिती व तिच्या भावाला औंध येथील तिच्या काकाकडे शिक्षणासाठी पाठवले.

-Ads-

तिचे काका कामानिमित्त तिच्या काकूसह गावी गेले होते. आदिती, तिचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ हे तिघेच घरी होते. मंगळवारी सकाळी आदितीच्या भावाची नर्सिंगची परिक्षा असल्याने तो पुण्यात निघून गेला. चुलत भाऊ अभिनय गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी बाहेर गेला. नेईमोद्दीन घरात आला व त्याने घरातील पांढऱ्या रंगाच्या एक्‍सटेन्शन वायरने आदितीचा गळा आवळला व ओढणीने घरातील पंख्याला गळफास घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)