प्रेम संबंधातून युवकाचा खून

पाच हल्लेखोरांवर गुन्हा, एकाला अटक : चाकण जवळील रासे वनहद्दीतील प्रकार
वाकी- प्रेम संबंधातून पाच जणांनी 32 वर्षीय युवकाचा लाकडी दांडक्‍याने व कमरेच्या चामडी पट्ट्याने जबर मारहाण करून खून केला आहे. ही घटना चाकण-आळंदी देवाची रस्त्यावरील चाकण जवळील रासे (ता. खेड) येथील वनहद्दीत शुक्रवारी (दि. 14) दुपारच्या सुमारास घडली. तर चाकण पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून आज (शनिवारी) यातील एकास त्याब्यात घेतले आहे, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.

नामदेव नागोराव जाधव (वय 32 , रा. निघोजे, ता.खेड, मूळ रा. नांदेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अविनाश उर्फ अभिराज रोहिदास देडे (वय 22, रा. मोशी, ता. हवेली) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अक्षय सोनवणे (रा. चिंबळी, ता. खेड), आदित्य मुऱ्हे (रा. मुऱ्हे वस्ती, कुरुळी, ता. खेड,), महादेव भाग्यवंत (रा. मोशी, ता. हवेली) व आकाश गायकवाड (रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर मृत जाधव यांचा भाऊ व्यंकट नागोराव जाधव (वय 28, रा. पुणे, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण परिसरातील दोन मुलींशी नामदेव जाधवचे सुत जुळले होते. मात्र, त्याला एकी सोबतच राहायचे होते; परंतु अक्षय सोनवणे त्या एका मुलीवरून त्याला खुनाच्या धमक्‍या देत होता. शुक्रवारी नामदेव दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अक्षय सोनवणे यास भेटण्यासाठी चिंबळी फाटा (ता. खेड) येथे जाणार होता. त्यानंतर पोलिसांनी संत ज्ञानेश्‍वर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अन्य चार अनोळखी व्यक्‍ती नामदेव यास गंभीर जखमी अवस्थेत दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करून निघून गेल्याचे निष्पन्न झाले. या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चार पैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता संबंधित युवकाने आपले नाव अविनाश रविराज रोहिदास देडे असे असल्याचे सांगितले.

त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव यांचे एकीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. परंतु अक्षय सोनवणे हा सुद्धा त्याच मुलीवर प्रेम करीत होता त्यावरून अक्षयने वेळोवेळी नामदेवला त्याबाबत समजावून सांगितले होते. परंतु नामदेव व त्यामुळीचे प्रेमसंबंध सुरूच राहिल्याने अक्षय त्याच्यावर चिडून होता. त्यामुळे त्याने शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास वरील सर्व मित्रांना बोलावून घेतले. व नामदेवला सुद्धा चिंबळी फाटा येथे बोलावून घेतले. तेथून सर्वांनी नामदेव यास गोड बोलून दुपारी अडीचच्या सुमारास चाकण आळंदी रोड लगतच्या रासे येथील गायरानात नेऊन लाकडी काठीने व कमरेच्या चामडी पट्ट्याने नामदेव यास जबर मारहाण केली.

त्यात नामदेव बेशुद्ध झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तेथील चौघांनी नामदेव यास संत ज्ञानेश्वर रूग्णालय मोशी, येथे नेले. अपघात झाल्याचा बनाव केला. आणि तिथून निघून गेले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे येथील पोलिसांनी एकास ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा अवघ्या काही तासातच उलगडा झाला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)