प्रेमी युगुलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पाच जणांना अटक ; पंचवीस गुन्ह्यांची कबुली
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) –सातारा व जावली तालुक्‍यात धरण परिसरात जोडपी व युगुलांना लुटणाया पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या टोळक्‍याने पंचवीस गुन्ह्यांची कबुली दिली असून सर्व संशयित बुधावलेवाडी खटाव येथील आहेत. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास कण्हेर परिसरात लूटमार झाल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे.
किरण बाळू बुधावले (वय 23), सतिश देवबा बुधवाले (वय 19), अक्षय लक्ष्मण बुधावले (वय 19), बाळू अंकुश बुधावले(वय 20 सर्व रा.बुधावलेवाडी) व अजय श्रीरंग जाधव (वय 27 रा.चिंचणी सर्व ता.खटाव) अशी अटक केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी विसापूर फाट्यावर काही जण येणार असल्याची पक्की माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दि. 8 रोजी पोलिसांनी सापळा लावला असता त्यामध्ये वरील सर्व संशयितांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायाक माहिती दिली.
संशयितांनी टोळीच्या माध्यमातून कास, कण्हेर धरण, मेढा परिसर तसेच गणपतीचा माळ ता.खटाव येथे पर्यटक व प्रेमी युगुलांची लुटमार करुन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले असल्याच्या 9 गुन्ह्यांची कबुली दिली. घरफोडीच्या 3 गुन्ह्याची कबुलीही दिली. याशिवाय नेर, डिस्कळ ता.खटाव, आंद्रुड ता.फलटण, स्वारगेट एसटी स्टॅंड येथील 4 पल्सर व 1 स्प्लेंडर अशा 5 दुचाकी चोरल्या. शेतीवरील इलेक्‍ट्रीक मोटारी व निर्जन परिसरात एकट्याला गाठून अनेक जबरी चोरी केल्याची कबुलीही संशयित चोरट्यांनी दिली. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची खातरजमा केली असता एकूण 25 गुन्ह्यांची कबुली संशयित चोरट्यांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, फौजदार प्रसन्न जर्हाड, शशिकांत मुसळे पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, निलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)